कला अकादमी च्या नाट्य महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कला अकादमीच्या नाट्य महाविद्यालयात दि. १७ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयातर्फे महाविद्यालय अंतर्गत देशभक्तीपर नृत्यस्पर्धा, उस्फुर्त गीतगायन इ.उपक्रमांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व नृत्यस्पर्धेकरिता परीक्षक म्हणून गोव्यातील नामवंत नृत्यांगना आद. प्रतिभा नाईक उपस्थित होत्या.
राजीव गांधी कला मंदिर फोंडया च्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रीय उपक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले..
या नंतर नृत्यस्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले .या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.शेफाली संदीप नाईक, द्वितीय क्रमांक कु.श्रुती खोरजुवेकर ,तृतीय क्रमांक कु.तानिया गायकवाड ,उत्तेजनार्थ प्रथम भूमी तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक संतोषी हिला प्राप्त झाला. प्रतिभा नाईक यांनी निःपक्षपातीपणे या स्पर्धेचे परीक्षण केले.विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त गायनाने कार्यक्रमास चार चांद लावले.
दुसऱ्या सत्रात हितेंद्र सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच युवा टुरिझम क्लबच्या अंतर्गत महाविद्यालयाने घडवलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्रीकांत गावडे, विष्णुपद बर्वे, सुषमा गावडे, आदित्य वेळीप व इतर शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राजीव गांधी कला मंदिर व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.